नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची स्थिती ‘न घर का, न घाट का’ अशी झाली आहे!
अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर नितीश कुमारांच्या मनात पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. त्यांनी गैर-भाजप पक्षांना ‘इंडिया आघाडी’च्या नावे एकत्र केले, पण त्यांनी आपला कसा ‘मामा’ केला, हे नितीश कुमारांना अखेरपर्यंत कळू शकले नाही. नितीश कुमार काही जयप्रकाश नारायण होऊ शकत नाहीत, जगजीवन राम होऊ शकत नाहीत, कर्पुरी ठाकूर होऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे व्ही. पी. सिंग यांच्यासारखा करिष्मा नाही.......